कणकवली परबवाडीत अजगर पकडला…

2
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.२५ : शहरातील परबवाडी येथे सचिन सरंगले यांच्या घराच्या परिसरात आलेल्या भल्यामोठ्या अजगराला आज जीवदान देण्यात आले. सकाळी श्री. सरंगले यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या लाकडांमध्ये भला मोठा अजगर आढळून आला. श्री सरंगले यांनी तातडीने सर्पमित्र यज्ञेश खरात आणि संकेत सावंत यांना पाचारण केले. त्यांनी या सुमारे आठ फुटी अजगराला शिताफीने पकडून नंतर नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. यावेळी अजगराला पाहण्यासाठी रहिवाशांनी गर्दी केली होती.