सावंतवाडी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लादले मातृत्व…

2
2
Google search engine
Google search engine

शेजारच्या अल्पवयीन मुलाकडून प्रकार; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

सावंतवाडी ता.०५: सह्याद्री पट्ट्यातील एका गावात १४ वर्षीय मुलीवर अत्याचार झाला आहे. हा प्रकार तिच्या शेजारी राहणा-या १६ वर्षीय मुलाकडून घडला आहे. संबधित मुलगी तीन महिन्याची गर्भवती आहे. दरम्यान याप्रकरणी संबंधित मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार येथील पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हा प्रकार दोन दिवसापूर्वी उघड झाला. संबंधित मुलीचे आई-वडील तिला तपासणीसाठी सावंतवाडी शहरातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे घेऊन गेले होते. यावेळी ती मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याबाबतची माहिती संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिसांना दिल्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्यात आली. दरम्यान आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.