माणगाव वाचनालयाच्या अध्यक्षपदी परशुराम चव्हाण यांची बिनविरोध निवड…

2
2
Google search engine
Google search engine

उपाध्यक्षपदी स्नेहल फणसळकर तर सचिवपदी एकनाथ केसरकर….

कुडाळ,ता.०५: श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षपदी परशुराम चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी स्नेहल फणसळकर,सचिवपदी एकनाथ केसरकर यांची निवड झाली.श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयाच्या सन २०२१ ते सन २०२४ साठी कार्यकारी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पाडली. यावेळी कार्यक्रमाचे माजी अध्यक्ष विजय पालकर उपस्थित होते.
३ ऑक्टोबर रोजी पदाधिकारी निवड करण्यात आली. यात इतर कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे : सहसचिव शामा पावसकर, अंतर्गत हिशेब तपासणीस सदाशिव पाटील तर सदस्य म्हणून विजय पालकर, स्नेहा माणगावकर, शरदचंद्र कोरगावकर, विजय केसरकर व सल्लागार म्हणून दिपक काणेकर व गणेश इंगळे अशी निवड झाली.
सर्व कार्यकारी संचालक मंडळाच्या सहकार्याने या वाचनालयाची प्रगतीकडे वाटचाल आपण करणार असे वाचनालयाचे नुतन अध्यक्ष परशुराम चव्हाण म्हणाले. वाचनालयाच्या रस्त्याबाबत सर्वांना विश्वासात घेऊन रस्त्याचे काम मार्गी लावू असे आश्वासन सल्लागार दिपक काणेकर यांनी दिले.
उपाध्यक्षपदी पदाला न्याय देण्याचे काम करेन असे स्नेहल फणसळकर म्हणाल्या. सचिव म्हणून गेले कित्तेक वर्ष काम करत असून तसेच काम आपण करु असे एकनाथ केसरकर म्हणाले.
तीनवेळा अध्यक्ष म्हणून वाचनालयाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार, नुतन कार्यकारिणीला आपले सहकार्य मिळेल अशा भावना माजी अध्यक्ष विजय पालकर यांनी व्यक्त केल्या. आभार सचिव एकनाथ केसरकर यांनी मानले.