कुडाळचे विद्यमान तीन पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये दाखल…

2
2
Google search engine
Google search engine

विशाल परबांचा धक्का; माजी खासदार निलेश राणेंच्या उपस्थितीत प्रवेश

कणकवली, ता.१०: कुडाळ येथील शिवसेनेच्या माजी पंचायत समिती सभापतीसह तीन पंचायत समिती सदस्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.
माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घेण्यात आला. यासाठी भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी त्या ठीकाणी शिवसेनेला धक्का दिला आहे. विदयमान पदाधिकारी भाजपात दाखल झाल्यामुळे त्या ठिकाणी तो शिवसेनेला धक्का मानला जात आहे.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, कुडाळ सभापती नूतन आईर, विशाल परब, आनंद शिरवलकर, सभापती अंकुश जाधव, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, भाजपा तालुकाध्यक्ष दादा साईल, विनायक राणे, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, पप्या तवटे आदी उपस्थित होते.