वाढत्या महागाईच्या विरोधात युवा सेनेचे उद्या सावंतवाडीत आंदोलन…

3
2
Google search engine
Google search engine

पदाधिकाऱ्यांची माहिती; कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन…

 

सावंतवाडी ता.३०: वाढत्या महागाईच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ येथील युवा सेनेच्या वतीने उद्या आंदोलन पुकारण्यात आले आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १०:०० वाजता हे आंदोलन छेडण्यात येईल, अशी माहिती युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. दरम्यान या आंदोलनाला सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर, युवा सेना सावंतवाडी तालुका समन्वयक गुणाजी गावडे, युवा सेना सावंतवाडी तालुका प्रमुख योगेश नाईक, पंकज शिरसाट, मदन राणे, भिवा गवस आदी पदाधिकारी करणार आहेत.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात येणार आहे. प्रचंड वाढलेल्या महागाई विषयी केंद्र सरकारच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. यावेळी सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने श्री. केसरकर यांच्या कार्यालयाकडे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.