दोन वर्षे कोरोना आणि ऐन दिवाळीत अवकाळी पावसाचे “धुमशान”…

3
2
Google search engine
Google search engine

बाजारपेठ सुनीसुनी; चांगल्या व्यावसायाच्या आशेवर असलेल्या व्यापार्‍यांचे लाखोचे नुकसान…

सावंतवाडी/निखिल माळकर,ता.०६: दोन वर्षे सलग कोरोना आणि यावर्षी ऐन दिवाळीच्या हंगामात पाऊस असल्यामुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे.अचानक आलेल्या पावसामुळे मात्र लाखोंचे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळी दिवशी आणि दुसर्‍या दिवशी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शहरातील रस्ते सुने-सुने होते.परिणामी व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यामुळे नैसगिक आव्हानांना तोंड द्यायचे कसे?अशी चिंता व्यापार्‍यांच्या तोंडावर दिसत होती. यावर्षी कोरोना आटोक्यात आल्यामुळे ऐन दिवाळ सणात चांगला व्यावसाय होईल या आशेवर व्यावसायिक होते.त्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात माल भरला होता.परंतू अचानक सायंकाळी अवकाळी पाउस दाखल होत असल्यामुळे व्यापार्‍याचे नुकसान झाले.
याबाबत व्यापारी तथा राष्ट्रवादी उदयोग व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी नाराजी व्यक्त केली.गेल्या दोन वर्षात व्यापार्‍यांचे झालेले नुकसान कधीही न भरुन निघणारे आहे.त्यात दिवाळीला व्यावसाय होईल ,अशी अपेक्षा होती. परंतू यावेळी सुध्दा पावसाने थैमान घातल्यामुळे व्यापार्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.