मडुरा गावात विजेचा “लपंडाव” सुरूच…

3
2
Google search engine
Google search engine

ग्रामस्थ हैराण; दिवाळीच्या दोन रात्री अंधारातच…

सावंतवाडी ता.०६: मडुरा गावात ऐन दिवाळीत विजेचा लपंडाव सुरूच आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दिवाळीच्या दोन रात्री अंधारातच घालवाव्या लागल्या. दरम्यान अद्यापही ही परिस्थिती जशीच्या तशी आहे. त्यामुळे पुढील दिवसात पुरवठा सुरळीत न केल्यास आक्रमक पवित्रा हाती घेऊ, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
मडुरा गावात दिवाळीच्या पूर्वसंध्येपासूनच विजेचा लपंडाव सुरु झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांना दिवाळीच्या पहिल्या पहाटेसह दोन रात्री सुद्धा अंधारात काढाव्या लागल्या. काही तांत्रिक बाबींमुळे हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे विद्युत वितरणने याची तात्काळ दखल घेऊन दिवाळीचे पुढचे दिवस हा पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आम्ही आक्रमक पवित्रा हाती घेऊ, असा इशारा दिला आहे.