आधी तात्पुरते स्थलांतर करा, नंतर भव्यदिव्य स्मारक उभारूया…

3
2
Google search engine
Google search engine

नीतेश राणे ; छत्रपतींच्या पुतळा स्थलांतराबाबत मांडली भूमिका…

कणकवली, ता.०८ : सकल मराठा समाज संघटना तसेच इतर सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आधी तात्पुरते स्थलांतर करूया आणि तेवीस गुंठे जागेची सर्व कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर तेथे भव्यदिव्य स्मारक उभारूया अशी मते मांडली आहेत. या भूमिकेला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी आज केले. तसेच महामार्गाच्या मध्यभागी असणारा सध्याचा पुतळा कधीही अपघाताला निमंत्रण देऊ शकतो. त्या घटनेनंतर संवेदनशील असलेली कणकवली आणखी वादंग होऊ शकतात. याबाबत तातडीने निर्णय व्हावा असेही ते म्हणाले.
कणकवली नगरपंचायत सभागृहात छत्रपतींचा पुतळा स्थलांतराबाबत आमदार नीतेश राणे यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, जे करता येणं शक्य आहे त्यावर आधी चर्चा होऊन निर्णय होणे आवश्यक आहे. सध्या छत्रपतींचा पुतळा असलेल्या जागेच्या बाजूलाच सुदर्शन हॉटेल लगत सार्वजनिक बांधकाम खात्याची पाचशे चौरस फुटाची जागा आहे. तेथे हा पुतळा स्थलांतर करणे आवश्यक आहे. ज्यावेळी बांधकामच्या २३ गुंठे जागेबाबतची सर्व कागदपत्रे पूर्ण होतील तेव्हा त्या जागेत भव्य स्वरूपात छत्रपतींचे स्मारक उभारता येईल. पालकमंत्री उदय सामंत राज्याच्या कॅबिनेटमध्ये आहे. त्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी आमची अपेक्षा असल्याचे, श्री.राणे म्हणाले.