“इंस्टाग्राम’ वापरण्यासाठी आता दर महिन्याला मोजावे लागणार ८९ रुपये…

2
2
Google search engine
Google search engine

नवीन ‘सबस्क्रीप्शन फिचर” लॉन्च होणार; क्रिएटर्स-इंनफ्लुएंसर्सना पैसेही कमावता येणार….

 

मुंबई, ता.११: ‘इंस्टाग्राम’ एक नवीन ‘सबस्क्रीप्शन फिचर लॉन्च करण्याचा तयारी करत आहे. त्यामुळे इंस्टाग्राम वापरण्यासाठी आता दर महिन्याला ८९ रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान आता या फिचरद्वारे क्रिएटर्स आणि इंनफ्लुएंसर्स पैसे कमवू शकतात.

इंस्टाग्राम एका नव्या सबस्क्रीप्शन फिचरवर काम करत आहे. त्यामध्ये यूजर्सला इंस्टाग्रामचा वापर करण्यासाठी दर महिन्याला ८९ रुपये मोजावे लागतील. त्यासाठी इंस्टाग्राम सबस्क्रीप्शन कॅटेगरीही तयार करण्यात आली आहे. इंस्टाग्राम युजर्सने ८९ रुपयांचे सबस्क्रिप्शन घेतले तर त्याला एक ‘बॅज’ देण्यात येईल. जेव्हा आपण कोणतीही कमेंट किंवा मॅसेज करू तेव्हा प्रत्येक वेळी हा ‘बॅज’ युजरनेमच्या बाजूला दिसेल. त्यामुळे सबस्क्रिप्शन घेणाऱ्या यूजर्सला ओळखणे सोपे जाईल.