विविध मागण्यांसाठी कारीवडे ग्रामस्थांचे सार्वजनिक बांधकाम समोर उपोषण…

4
2
Google search engine
Google search engine

आमदार दिपक केसरकरांची मध्यस्थी; मागण्या पुर्ण करण्याच्या अधिकार्‍यांना सुचना…

 

सावंतवाडी ता.१५: कारीवडे येथील ग्रामस्थांनी आज येथिल बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. यावेळी आमदार दिपक केसरकर यांनी आंदोलन स्थळी भेट देत सर्व मागण्या पुुर्ण करण्याचे आश्वासन दिले. तशा सुचना कार्यकारी अभियंता सौ.अनामिका चव्हाण यांना दिल्या. त्यानंतर आंदोलन कर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.

यावेळी पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मंगेश तळवणेकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, ग्रामस्थ आनंद तळवणेकर, केशव सहील, तानाजी सहिल, अशोक माळकर, संजय माळकर, प्रशांत राणे, अमोल करिवडेकर, बाळा गावकर, भालचंद्र भालमर आदींसह उपस्थित होते.

कारीवडे गवळणीचा व्हाळ व पेडवेवाडी स्टॉप येथे अपघाताचे प्रमाणे वाढले आहे. त्यामुळे परिसरात गतिरोधक, दिशादर्शक फलक, पांढरे पट्टे आणि रेडीयम बसविण्यात यावेत, अशी त्यांनी मागणी केली होती. यावेळी या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील, असे लेखी आश्वासन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.