“आम्हाला गर्व हिंदुत्वाचा” या व्हाँट्सअप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी…

2
2
Google search engine
Google search engine

पणदूर येथील सविता आश्रमाला जीवनावश्‍यक वस्तूंची मदत; शिवसेनेच्या माध्यमातून पुढाकार…


बांदा, ता.१७:
शिवसेना पुरस्कृत ‘आम्हाला गर्व हिंदूत्वाचा’ या व्हॉट्सअप समूहाच्या वतीने संवीता आश्रम पणदूर येथील निराधार संस्थेस जीवनावश्यक वस्तूंचे वाटप जिल्हाप्रमुख संजय पडते व गटनेते नागेंद्र परब यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
संजय पडते म्हणाले की, आपल्या मोबाईल मध्ये अनेक ग्रुप असतात पण असा एक गृप आहे जो गरजवंताना मदत करतो. हा ग्रुप आहे आपल्या कट्टर शिवसैनिकांचा. ज्यामध्ये संपूर्ण राज्यातील १२०० सदस्य एकत्र आले आहेत. बाळासाहेबांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्त्वानुसार हा ग्रुप संपूर्ण महाराष्ट्रात कार्य करत आहेत. विशेष म्हणजे ह्या ग्रुपमध्ये सर्व सदस्य हे शिवसैनिक आहेत. भगव्याचा अभिमान असणारा हा ग्रुप आपल्या कमाईच्या बचतीतून दर महिन्याला काही रक्कम ग्रुपमध्ये जमा करून अनाथ आश्रम व गरजू लोकांना मदत कार्य करत असतात. आज ‘आम्हाला गर्व हिंदूत्वाचा’ हा ग्रुप सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होऊन ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून संविता आश्रम पणदूर या निराधार संस्थेस जीवनावश्यक वस्तू व धान्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संजय पडते व नागेंद्र परब यांनी या  ग्रुपच्या सदस्यांचे अभिनंदन करून कौतुक केले व आपण हे कार्य करत आहात याचा आम्हाला अभिमान असून आपल्या कार्यास आमचा सलाम असल्याचे सांगितले.
यावेळी सविता आश्रमाचे संस्थापक संदीप परब, समूहाचे संस्थापक संतोष पाटील, शिवसेना बांदा शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, ओंकार नाडकर्णी, वसंत सोनावणे, अनिल कांबळे, प्रविण कोर्टे, बाळासाहेब निकम, अशोक कोळंबकर, सुर्यकांत शिंदे, लवेश म्हात्रे, भाऊ वाळके, पांडुरंग नाटेकर, ज्ञानेश्वर येडवे, राकेश वाळके आदी उपस्थित होते.