येत्या दिवसात पहिलीपासून सर्व शाळा सुरू होण्याची शक्यता…

1
2
Google search engine
Google search engine

मुंबई, ता.१७: काही दिवसात पहिलीपासूनच्या सर्व शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत मंगळवारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेत पहिलीपासूनच्या सर्व शाळा सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. दरम्यान अंतिम निर्णय टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर शाळासंदर्भात निर्णय होणार आहे.

कोरोना संसर्गामुळे राज्यातील शाळा बंद होत्या. आता कोरोना संसर्ग कमी होताना दिसत आहे तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणात राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे काही दिवसात पहिलीपासूनच्या सर्व शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम निर्णय टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर शाळासंदर्भात निर्णय होणार आहे.