मराठा समाजाच्या वतीने सावंतवाडी पोलिसांचा सत्कार…

2
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी, ता.१७: शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा काही दिवसात यशस्वी तपास करणाऱ्या येथील पोलीस निरीक्षक शंकर कोरे व सहकाऱ्यांचा आज सावंतवाडी तालुका मराठा समाजाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मराठा समाजाचे ज्येष्ठ सल्लागार तथा माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत व तालुकाध्यक्ष सिताराम गावडे,विश्वास घाग, विक्रम सावंत, नारायण गावडे, अभिमन्यू लोंढे, उमेश सावंत, आधी मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सावंतवाडी शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली अवैध धंद्यातून गैरकृत्य, नवयुवकांची वाम मार्गाकडे वाटचाल याकडे पोलिस निरीक्षकांचे लक्ष वेधून अशा धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी श्री. कोरे यांनी शक्य होईल तेवढी ताकद वापरून आपण या धंद्यांचे समूळ उच्चाटन करून असे आश्वासन दिले.