माजगावातील त्या चंगू, मंगू, टिंगूंची कासारांवर बोलण्याची पात्रता नाही…

4
2
Google search engine
Google search engine

दिनेश सावंतांचे प्रत्यूत्तर; विशाल परबांनीच उत्तर द्यावे, पडद्याच्या मागे राहून दुसर्‍यांना पुढे करू नका…

सावंतवाडी ता.१९: तालुक्याच्या पंचायत समिती सारख्या सभागृहात मानाचे स्थान भूषविलेल्या चद्रकांत कासार यांच्यावर माजगावातील गल्लीबोळात राहणार्‍या चंगू, मंगू, टिंगूंनी बोलू नये, असा टोला माजगावचे सरपंच दिनेश सावंत यांनी लगावला आहे. दरम्यान विशाल परब यांना हीमंत असेल तर त्यांनी थेट येवून कासार यांच्यावर टिका करून दाखवावी, पडद्याच्या मागे राहून त्यांनी आपले अपयश लपविण्यासाठी दुसऱ्यांना पुढे करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत श्री. सावंत यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, पंचायत समितीचे माजी सभापती कासार यांच्यावर माजगाव मधील काही भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी टिका केली होती. त्याला प्रत्यूत्तर देताना श्री. सावंत म्हणाले, ज्यावेळी कासार निवडणूकीत उतरले त्या- त्या वेळी त्यांनी विरोधकांना पाणी पाजले आहे. त्यामुळे अशा चंगू मंगूनी त्यांच्यावर टिका करणे योग्य नाही. दुसर्‍यावर टिका करण्यापेक्षा तुमच्या घरात काय शिजते हे आम्ही बाहेर काढले, तर तुम्हाला घराबाहेर पडणे सुद्धा कठीण होईल, असे म्हटले आहे.
यावेळी सावंत यांचा वाढदिवस असल्याने आमदार दिपक केसरकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका प्रमुख रुपेश राउळ,चद्रकांत कासार,राजन मुळीक आदी उपस्थित होते.