सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड…

2
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. २१ : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन आयोजित ४५ वर्षांवरील सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्यातील आठ संघांसाठी खेळाडूंची निवड चिवला बीच येथील हॉटेल सिल्वर सँड येथे चिट्ठीद्वारे करण्यात आली.
जिल्ह्यात प्रथमच ४५ वर्षांवरील टेनिस क्रिकेट खेळाडूंसाठी सिंधुदुर्ग लीगचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू वासुदेव वरवडेकर यांच्या संकल्पनेतील या स्पर्धेचे आयोजन ४ आणि ५ डिसेंबर या दोन दिवशी मालवण एज्युकेशन सोसायटीच्या बोर्डिंग मैदान येथे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आठ संघांसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली. यात संघ मालक नितीन वाळके यांचा कपिलदेवसंघ, बाबा परब यांचा गुंडाप्पा विश्वनाथ संघ, अनिल हळदिवे यांचा सय्यद किरमाणी संघ, काका कुडाळकर यांचा के. श्रीकांत संघ, कणकवली २ बिशनसिंग बेदी संघ, बाबा गाड यांचा सुनील गावसकर संघ, बबन परब यांचा मोहिंदर अमरनाथ संघ, उदय रुमडे यांचा दिलीप वेंगसरकर संघ या आठ संघांचा समावेश आहे. प्रत्येक संघामध्ये ४५ ते ५० वर्षे प्रथम गट, ५० ते ५५ वर्षे द्वितीय गट, ५५ ते ६० वर्षे तृतीय गट आणि ६० वर्षांवरील खेळाडूंचा चतुर्थ गट या वयोगटांप्रमाणे खेळाडूंची चिठ्ठीद्वारे प्रत्येक संघामध्ये निवड करण्यात आली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष अनिल हळदिवे, उपाध्यक्ष काका कुडाळकर, पप्पू परब, बबन परब, बाबली वायंगणकर, बाबा परब, प्रदीप कुबल, अभय नाईक, बाबा गाड, दत्तात्रय कल्याणकर, दिलीप परब, प्रशांत बांदेकर, सुनील धुरी, शरद शिरोडकर, गोविंद कुडाळकर, रिझवान शेख, वासुदेव वरवडेकर, निळकंठ मालणकर, सुधीर सारंग, शंकर पराडकर, विक्रम मोरे, आम्रोज आल्मेडा, दीपक धुरी आदी ज्येष्ठ क्रिकेटपटू उपस्थित होते.