सावंतवाडी शहरात सुरू असलेले “जिओ”चे काम सर्वपक्षीयांनी रोखले…

4
2
Google search engine
Google search engine

उद्धट उत्तरामुळे नागरिक आक्रमक; सरकारी काम असल्याने तक्रार घेण्यास पोलिसांचा नकार

सावंतवाडी, ता.२२ :शहरातील सालईवाड्यात बाजारपेठ आर पी डी रोड संचयनी परिसरात एक बाजूने जिओ खोदाई व मातीचे ढीग असताना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने खोदाईचा घाट घातला जात असल्याने संचयनी परिसरातील नागरिकांनी काम थांबविले तसेच कंपनीच्या अधिकाऱ्याने उद्धट उत्तर दिल्याने वाहतुकीस अडथळ्या विरोधात जिओ विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले मात्र ते सरकारी काम असल्याने तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिला
यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, तौकिर शेख, देवेंद्र टेंमकर, सुनिल पेडणेकर, संतोष गांवस, केतन आजगावकर, परिक्षित मांजरेकर, संतोष जोईल, नियाज शेख, इफ्तिकार राजगुरू आदी नागरिक व्यापारी उपस्थित होते.
ऐन दिवाळीच्या काही दिवस सणात खोदाईचे काम सूरू केल्याने बाजारपेठेत खोदण्यात आलेल्या चारामुळे व्यापारी वर्ग चांगलाच त्रस्त झाला आहे. ऐन दिवाळीत पाऊस पडल्याने शहर जिओ च्या खोदाई मुळे चिखलाने माखले आहे. दुकानासमोर खोदाई झाल्याने ग्राहकांचा देखील खड्यात अडकून अपघात झाले असे दळवी म्हणाले.
स्थानिक नागरिक संतोष गांवस यांनी दुसऱ्या बाजूला खोडाईचे सुरू होणारे काम रोखले त्यानंतर परिसरातील व्यापारी वर्गाने देखील या कामाबाबत संतप्त व्यक्त केला तर दोन्ही बाजूने एकाच वेळी खोदाई केल्याने वाहतुकीचा वाहतूक कोंडीचा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला होता शाळकरी मुलांना देखील मातीच्या ढिगाऱ्यावरून जावे लागल्यास जबाबदार कोण एकही संबंधित ठेकेदार किवा सुपरवायझर पालिकेचा कर्मचारी देखील उपस्थित नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना संपर्क केला त्या ही त्या कामाबाबत अनभिज्ञ होत्या तर कर्मचाऱ्यांना पाठवते असे त्यांनी सांगितले मात्र तब्बल अर्धा तासाहून अधिक काळ त्या ठिकाणी एकही अधिकारी कर्मचारी दाखल झाला नसल्याने नागरिक व्यापारी सर्व पक्षीय एकवटत चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले काम रोखले तसेच नगरपालिकेचा एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त केली.
त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या जिओ कंपनी कर्मचाऱ्याला धारेवर धरत आधी एका बाजूने काम पूर्ण करा व त्यानंतर दुसऱ्या बाजूने काम हाती घ्या अशा सूचना देण्यात आल्या रस्त्यावरील काम अपूर्ण स्थितीत असताना रस्त्याच्या मधोमध सुरू असलेले खोदकाम रोखले तसेच चर ही संतप्त नागरिकांनी बुजवायला कामगारांना भाग पाडले.
रास्ता एका बाजूनं खोदकाम केलेला असल्याने तसेच मातीचे ढीग असल्याने वाहतुकीसाठी व रहदारीसाठी नागरिकांना त्रास होत आहे. त्यात एक काम अर्धवट असताना दुसरी खोदाई केल्यास नाहक मनस्ताप सहन करावा लागणार आहे. तर दोन्हीबाजून बॅरिकेट्स लावून रस्ता बंद केल्यानं वाहतूकीचा प्रश्न निर्माण होत आहे.याबाबत नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत जाब विचारला.