आडेली-खुटवळवाडी येथील बंधाऱ्याचे शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्या हस्ते लोकार्पण…

1
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.२२: माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनीनी जिल्हा नियोजन निधीतून मंजूर केलेल्या आडेली खुटवळवाडी येथील सुमारे 20 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचा लोकार्पण सोहळा रविवारी वेंगुर्लेचे माजी सभापती व शिवसेना तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळु परब यांच्या हस्ते व शिवसेना ओबीसी सेल तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, माजी सरपंच प्रकाश गडेकर, आडेली सोसायटीचे माजी चेअरमन चंद्रकांत गडेकर, उपसरपंच संतोष कासले, सदस्य घनश्याम नाईक, मठ ग्रामपंचायत सदस्य बबन परब, सचिन गडेकर, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, दाभोली सरपंच उदय दाभोलकर, दयानंद शेणई, संजय परब यांच्या प्रमुख उपस्थितीत जलपूजन व श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी शाखाप्रमुख बाळू सावंत, तुषार कांबळी, प्रवीण गडेकर, स्वप्निल गडेकर, महादेव काजरेकर, आपा धुरी, सुभाष कासले, नारायण कासले, गणपत परब, अरुण परब, विठ्ठल परब, रमेश परब, सुरेश परब, बाळा परब, मंगेश कावले, जनार्दन कासले, मुकुंद कासले, किशोर कासले, समीर आईर, बंड्या रेडकर, जिजी कासले, अक्षय परब, रुपेश परब, रोहन दाभोलकर, साहिल वराडकर, अक्षय गडेकर, स्वयम गडेकर, महादेव कासले, आणि ग्रामस्थ, युवासैनिक व महिला वर्ग उपस्थित होते.
सदर कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार दीपकभाई केसरकर यांचे आडेलीवासिय, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून आभार मानण्यात आले.