जिल्हा परिषदेतील भ्रष्ट कर्मचाऱ्यांची पंचायतराज समितीकडे तक्रार करणार…

0
2
Google search engine
Google search engine

प्रसाद गावडे; त्यांना नेमका कोणाचा वरदहस्त याचीही चौकशी करा, मनसेची मागणी…

 

कुडाळ, ता.२२: जिल्हा परिषद कार्यालय एकाच जागेवर अनेक वर्षे राहुन भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी पंचायतराज समितीकडे करण्यात येणार आहे असा इशारा मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिला आहे.
वारंवार भ्रष्टाचार करून मोठ्या प्रमाणात गैरकारभार करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना नेमका कोणाचा वरदहस्त आहे याचासुद्धा शोध घेणे गरजेचे आहे असा सवाल त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

त्यांनी प्रसिद्धीपत्रकामध्ये असे म्हटले आहे की, जिल्हा परिषदकडील प्रशासकीय कारभाराचा मागील तीन वर्षांचा आढावा घेतला असता प्रशासकीय कारभारात अनियमितता व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. यामध्ये वर्षानुवर्ष एकाच कार्यसनावर ठाण मांडून बसलेले कर्मचारी कारणीभूत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते.मुळात पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच विभागात व तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच कार्यसनावर काम करणे नियमानुसार प्रतिबंधित असताना प्रत्यक्षात मात्र काही कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच कार्यासनावर ठाण मांडुन “हम करे सो कायदा” या पद्धतीने प्रशासकीय कारभार हाकत आहेत.
कायदेशीर तरतुदींना बगल देऊन प्रचलित कार्यपध्दती अशा कर्मचाऱ्यांना “नियम” वाटू लागली आहे असे चित्र आहे. शिवाय विभागीय आयुक्तांचे आदेश असताना देखील प्रतिनियुक्त्या रद्द केलेल्या नाहीत. कालांतराने एकाच पदावर व कार्यासनावर राहून त्यातील कायदेशीर पळवाटा माहीत झाल्याने कर्मचाऱ्यांकडून कळत-नकळतपणे अनियमितता घडून येतात व परिणामी पारदर्शी प्रशासनावर थेट परिणाम होतो. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडील लाड पागे नियुक्त्या भ्रष्टाचार,अनुकंपा नियुक्ति भ्रष्ट कारभार, वॉटर प्युरिफायर-टेलिव्हिजन यासारखे शिक्षण विभागाकडील खरेदी प्रक्रियेतील गैर प्रकार,भ्रष्टाचार आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या बक्षिसी देणे यासारख्या घटना यामधूनच घडून येतात