पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग १ डिसेंबर पासून सुरू होणार…

1
2
Google search engine
Google search engine

वर्षा गायकवाड; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय…

मुंबई, ता.२५: गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या शाळा १ डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

त्या पुढे म्हणाल्या, ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवी या शाळा एक डिसेंबरपासून सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. त्यासाठी लागणारी तयारी या काळात आम्हाला करता येईल. यापुढे महाराष्ट्रात पहिलीपासून ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू होतील. अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेलेला आहे. दोन वर्षांनंतर सर्व शाळा सुरू करण्यात येत असून, त्यासंदर्भातली सर्व काळजी आम्ही घेणार आहोत, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. राज्याच्या शिक्षण विभागानं आता पहिलीपासून बारावीपर्यंत सर्व वर्ग सुरू करण्यास मंजुरी दिलीय. प्राथमिक शाळा ऑफलाईन पद्धतीनं सुरु करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागानं मांडला होता, त्याला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलीय. शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला राज्याच्या आरोग्य विभागानं परवानगी दिली होती. याशिवाय चाईल्ड टास्क फोर्सनं देखील शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिलीय.