इन्सुली-मेटात कार थेट गटारात कोसळली…

1
2
Google search engine
Google search engine

जीवितहानी नाही; मात्र गाडीचे मोठे नुकसान…

सावंतवाडी ता.२९: चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार थेट रस्त्याच्या कडेला गटारात जाऊन अपघात झाला. ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास इन्सुली-मेट परिसरात घडली. दरम्यान सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की संबंधित कार गोव्याच्या दिशेने जात होती. यावेळी ती इन्सुली मेट परिसरात आली असता चालकाचा ताबा सुटल्याने रस्ता सोडून थेट गटर कोसळली. यात गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र आतील प्रवाशांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. संबंधित कार ही नाशिक पासिंगची असून त्यातील प्रवासी गोवा येथे पर्यटनासाठी जात होते, असे बोलले जात आहे.