मालवणच्या अनिरुद्ध आचरेकरला “को.म.सा.प”चा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार…

4
2
Google search engine
Google search engine

दोडामार्ग,ता.०१: कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्गचा “आदर्श कार्यकर्ता पुरस्कार” अनिरुद्ध लक्ष्मण आचरेकर यांना जाहीर झाला आहे. आचरेकर कोमसापच्या मालवण शाखेचे सचिवआहेत. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात रविवारी होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सभासद स्नेहमेळाव्यात त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापुर्वी हा पुरस्कार जेष्ठ कवी आनंद वैद्य; मालवणी कवी रुजारिओ पिंटो, जेष्ठ साहित्यिका कादंबरीकार वृंदा कांबळी यांना प्रदान करण्यात आला होता. श्री. आचरेकर यांनी मालवण तालुका को. म. सा. प. चे सचिव पदाच्या आपल्या कारकिर्दीत झपुर्झा या को. म. सा. प. मासिकाचे ५० आजीव सभासद केले. कोमसापचे १७५ आजीव सभासद केले. तसेच त्यांनी सन १८ – १ ९ ते २०- २१ पर्यंतचे सर्व ऑडिट रिपोर्ट प्रथम दिले आहेत . ऑनलाईन / ऑफलाईन विविध ३३ कार्यक्रम घेऊन उत्तम कामगिरी बजावली आहे.

त्यांच्या सर्व कार्याचा विचार करून कोमसाप निवड समिती सदस्य तथा जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, रूजारिओ पिंटो, भरत गावडे, विठ्ठल कदम, सौ. वृदां कांबळी, सुरेश ठाकूर यांनी एकमताने कोमसाप आदर्श कार्यकर्ता पुरस्करासाठी निवड केली आहे.