आता संतोष कविटकरांच्या निलंबनासह कार्यकालाच्या चौकशीची मागणी करणार…

2
2
Google search engine
Google search engine

भास्कर परबांचा इशारा ; कोणाची पाठराखण करावी याचा भाऊ धुमक यांनी विचार करुन निर्णय घ्यावा…

कुडाळ,ता.०५: जलसंपदाचे अभियंता संतोष कविटकर यांच्या बदलीवरुन आम्ही कोणतेही राजकारण केलेले नाही. तरीही ते काही लोकांना पुढे करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असतील तर आता त्यांच्या निलंबनासह कार्यकालाच्या चौकशीची मागणी आपण करणार आहे, असा इशारा जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष भास्कर परब यांनी दिला आहे.

दरम्यान त्यांची बदली रद्द करण्याची भाषा करणार्‍या भाऊ धुमक यांनी बदली रद्द करुन दाखवावीच, असा प्रतिइशारा परब यांनी दिला आहे. आपल्याकडे त्यांच्या विरोधात पुरावे आहेत. त्यामुळे दुसर्‍यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून कविटकर यांनी आपल्याला वाचविण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच आपण नेमके कोणाला पाठीशी घालतो, याचा धुमक यांनी विचार करावा, असेही परब म्हणाले आहेत. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.