वेंगुर्ल्यात १६ डिसेंबर पासून “नगराध्यक्ष चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा”…

4
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.०९: स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर असणाऱ्या वेंगुर्ला शहराबरोबरच, संपूर्ण जिल्हयातील नागरीकांपर्यंत स्वच्छतेच्या सवयीचा प्रचार व प्रसार करण्याकरीता वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत १६ ते १९ डिसेंबर दरम्यान नगराध्यक्ष चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचा शुभारंभ समारंभ १६ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वा. नगरपरिषदेच्या कॅम्प स्टेडीयम येथे होणार आहे. स्पर्धेमध्ये जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामधून एक असे एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. याकरीता कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क लागू नाही. तरीही या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी संघांनी स्पर्धेकरीता १४ डिसेंबर रोजी सायं.०६.०० पर्यंत पूर्वनोंदणी करणे आवश्यक असून नावनोंदणीकरीता नगरपरिषद कार्यालयामध्ये श्री. सागर चौधरी (९१७५७९९९७९) व श्री. पंकज केळुस्कर (८०८७८५८७४७) यांच्याशी संपर्क साधायचा आहे. या स्पर्धेमधील प्रत्येक सामना मर्यादीत १५ षटकांचा असून या सामन्यामध्ये भाग घेण्याकरीता संघातील प्रत्येक खेळाडूने एकाच प्रकारचा व पांढऱ्या रंगाचा पोषाख वापरावयाचा आहे. प्रत्येक सहभागी संघाने स्पर्धेकरीता आवश्यक साहित्य (क्रिकेट किट) स्वतः आणावयाचे आहे.
स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, व्दितीय क्रमांक व उपांत्य फेरीतील दोन्ही संघांना अनुक्रमे १०,०००, ७००० व २००० असे रोख बक्षिस व आकर्षक चषक बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवार १९ डिसेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता खेळविण्यात येईल. तरी या स्पर्धेत सर्व खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले आहे.