चेतना महिला विकास केंद्रातर्फे वेंगुर्ले येथे “मानवी हक्क दिन” साजरा…

2
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.११: चेतना महिला विकास केंद्रातर्फे वेंगुर्ले येथे मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे विधवा झालेल्या महिलांना आर्थिक तसेच वस्तुस्वरूपात मदत करण्यात आली.
चेतना च्या बचत गटांमार्फत गेल्या वर्षभरापासूनच याविषयी काम सुरू होते. सप्टेंबर महिन्यापासून कार्यकर्त्या स्नेहल बागायतकर, इजाबेल डिसोजा, प्रिया वराडकर, लुद्दीन फर्नांडिस , पूजा जाधव व सिद्धी शिंदे यांनी विधवा महिलांचे सर्वेक्षण सुरू केले होते. दरम्यान मदत कार्यक्रमावेळी उभादांडा माजी सरपंच सुकन्या नरसुले, ग्रामपंचायत सदस्या अपेक्षा बागायतकर, डॉ. दीपाली देसाई, अंगणवाडी सेविका तेजस्वी उपसकर या प्रमुख पाहुण्या उपस्थित होत्या. यावेळी डॉ. दीपाली देसाई यांनी कोरोना आजाराबद्दल सविस्तर माहिती दिली व लसीकरणाचे महत्व या विषयावर जनजागृती केली. तर सुकन्या नरसुले यांनी सरकारी योजनांबद्दल माहिती दिली. महिलांना सरकारी योजनांची माहिती मिळवून देणे, त्यासाठी लागणारी कागदपत्रे मिळवून देण्यात महिलांची मदत करणे तसेच अशा महिलांसाठी आधारव्यवस्था निर्माण करून त्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम चेतना महिला विकास केंद्रामार्फत सुरू आहे.