सावंतवाडीत लोकअदालत संपन्न, १५८ प्रकरणावर निर्णय…

4
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.११: येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सावंतवाडी दिवाणी व फौजदारी न्यायालयालयातील ठेवलेल्या ९९३ प्रकरणापैकी १५८ प्रकरणी निर्णय होवून १० लाख ३८ हजार २१२ रक्कम वसूलीचा निर्णय घेतला.उच्च न्यायालय मुंबई,महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांचे निर्देशास अनुसरून दिवाणी न्यायालय, सावंतवाडी येथे आज रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सावंतवाडी तालुका विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर आर बेडगकर यांच्या हस्ते द्धिपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सावंतवाडी वकील संघटना अध्यक्ष अँड. पी.डी. देसाई,सह दिवाणी अधिक्षक आर आर तारी, सहाय्यक दिवाणी (वित्त) अधिक्षक स्नेहा सावंत, कनिष्ठ लिपिक श्री. व्ही. जी.पवार, स्नेहा गिरप, पक्षकार, न्यायालयालयीन कर्मचारी उपस्थित होते.

आजच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वाद पूर्व प्रकरणे ५६६ ठेवली होती त्यातील ५७ तडजोड झाली. त्यातून तीन लाख ९४ हजार ३९८ रुपये रकमेची वसुली झाली तसेच दिवाणी व फौजदारी कडील पेंडिंग प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यातील दिवाणी ९४ आणि फौजदारी कडील ३३३ मिळून ४२७ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील दिवाणी ९४ प्रकरणांपैकी ४ प्रकरणे तर फौजदारी ९७ प्रकरणी तडजोड झाली.या एकूण ९९३ पैकी १५८ प्रकरणी निकाली झाला.शिवाय दिवाणी व फौजदारी १०१प्रकरणी सहा लाख ४३ हजार ८१२ रूपये एवढी रक्कम वसूल झाली. आजच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १५८ प्रकरणी १० लाख ३८ हजार २१२ रूपये वसुलीचा तडजोडीने निर्णय घेतला गेला.

यावेळी सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर आर बेडगकर यांनी आजचा राष्ट्रीय लोक अदालत प्रसंगी पक्षकारांनी समाधानकारक तडजोडीचा निर्णय घेतल्या बद्दल धन्यवाद दिले.