शिवसेनेच्या दणक्यानंतर डिंगणे-बांदा रस्त्याच्या कामाला सुरुवात…

2
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.१३: डिंगणे-बाबरवाडी-बांदा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत शिवसेनेने आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर आजपासून ठेकेदाराने रस्ता दुरूस्तीच्या कामास सुरुवात केली.

या रस्त्यावर खड्डे पडल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. त्यामुळे तात्काळ काम करावे अन्यथा ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडू असा इशारा युवासेना विभाग प्रमुख ज्ञानेश्वर येडवे व शिवसेना बांदा उपविभाग प्रमुख ओंकार नाडकर्णी यांनी दिला होता. याची दखल घेत ठेकेदाराने आजपासून रस्ता दुरुस्तीच्या कामास प्रारंभ केला. यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.