दोडामार्गातील खड्डे बुजविण्याचे काम नागरिकांनी रोखले…

2
2
Google search engine
Google search engine

निकृष्ट झाल्याचा आरोप; कामाचा दर्जा सुधारण्याची मागणी…

दोडामार्ग,ता.१३: येथील जुने पोलीस स्थानक ते गांधी चौक पर्यंतचे चालू असलेले खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे,असा आरोप नागरिकांनी केला आहे.तसेच डांबर न वापरल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी ते काम बंद पाडले.

यावेळी सामजिक कायकर्ते संदेश वरक, मनसे तालुकाध्यक्ष सुनील गवस,गोविंद शिरोडकर, आदी उपस्थित होते.

दोडामार्ग बाजारपेठेत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट झाल्याचा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी ठेकेदाराला धारेवर धरत याबाबत जाब विचारला आणि काम रोखुन धरले.