राणेंकडून दहशतीचे राजकारण…

2
2
Google search engine
Google search engine

वैभव नाईक ; पुन्हा हल्‍ला झाल्‍यास शिवसेना स्टाईलने उत्तर…

कणकवली, ता.१८ : जिल्‍हा बँक निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागणार आहे. हे आमदार नितेश राणेंच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राजकीय दहशतीचे राजकारण सुरु केले आहे. मात्र पुन्हा हल्‍ल्‍याचा प्रकार झाला तर शिवसेना स्टाईलने आम्‍ही उत्तर देऊ असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी आज दिला.

श्री.नाईक म्‍हणाले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी निवडणूक लढवत आहे. सतीश सावंत यांचे खंदे समर्थक व सहकारातील कार्यकर्ते संतोष परब हे सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागणार आहे.हे आम.नितेश राणेंच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राजकीय दहशतीचे राजकारण सुरु केले आहे. तसेच कार्यकर्त्यांन वर दबाव टाकून भीतीचे वातावरण तयार केले जात आहे. यातूनच संतोष परब यांच्यावर आज जीवघेणा हल्ला करण्यात आला या हल्याचा आम्ही निषेध करतो. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव दिसू लागल्याने आम.नितेश राणेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अशा प्रकारचे कृत्य पुन्हा घडल्यास जशास तसे उत्तर सेनेकडून दिले जाईल.असा इशारा आम नाईक यांनी बोलताना दिला.