विनयभंग केल्याप्रकरणी मालवणातील एकाला तीन वर्षे कारावास…  

1
2
Google search engine
Google search engine

ओरोस,ता.१८: मालवण तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या शहरातील दांडी अपराधवाडी येथील विनय नारायण जाधव (वय २५) याला जिल्हा विशेष न्यायाधीश यांनी तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड थोटावला आहे. दंड न भरल्यास सात दिवसांची साधी कैद सुनावली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले.

१९ डिसेंबर २०१८ रोजी आरोपी विनय जाधव हा पार्किंगमध्ये लावलेली गाडी काढून कसालच्या दिशेने जात असताना तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी पीडित मुलीने २२ डिसेंबर २०१८ रोजी तक्रार दाखल केली होती. त्याच दिवशी आरोपी विनय जाधव याला मालवण पोलिसांनी अटक केली होती. भादवी कलम ३५४ (डी), बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमाच्या तरतुदीतील कलम ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी न्यायालया सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. न्यायालयाने एकूण पाच साक्षीदार तपासले. पीडित मुलगी, तिची आई, प्रत्यक्षदर्शी, तपासीक अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. सध्या मुंबई-वाशी येथे कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रेश्मा मोमीन यांनी या प्रकरणाचा यशस्वी तपास केला. पिडीतीने सांगितलेली घटना आणि न्यायालया समोर आलेले पुरावे तसेच प्रत्यक्षदर्शी यांची साक्ष आणि पोलिसांनी केलेला तपास या आधारे सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा विशेष न्यायालयाने विनय जाधव याला दोषी ठरवत तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.