मठ-कुडाळ रस्त्यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी आज बैठक…

2
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्लेतील मारुती मंदिरात आयोजन; नागरिकांसह सर्वपक्षीय पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन…

वेंगुर्ले ता.१९: मठ-कुडाळ रस्त्यासाठी २७ डिसेंबरला पुकारण्यात आलेल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज शहरात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक सायं.३:३० वा. बाजारपेठेतील मारुती मंदिरात होणार आहे. यावेळी नागरिकांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी-पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन करावे, असे आवाहन येथील सामाजिक कार्यकर्ते नंदन वेंगुर्लेकर व मनीष सातार्डेकर यांनी केले आहे. याबाबतची माहिती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, मठ-कुडाळ रस्त्याच्या डांबरीकरणाची वारंवार मागणी करून सुद्धा याकडे संबंधित विभाग लक्ष देत नाही. त्याचा नाहक त्रास या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांसह वाहनधारकांना होत आहे. त्यामुळे याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ डिसेंबरला या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले आहे. दरम्यान या संदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी आज सायंकाळी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.