प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांना तात्काळ निधी दया…

1
2
Google search engine
Google search engine

विनायक राऊत; ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे केली मागणी…

कुडाळ,ता.२०: प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांना तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी ग्रामविकास मंत्री गिरिराज सिंह यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी नुकतीच दिल्ली येथे जाऊन श्री.गिरीराज सिंह यांची भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मंजूर झालेल्या रस्त्यांना तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी लवकरात-लवकर निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे आश्वासन श्री. सिंह यांनी सांगितले.