वेंगुर्लेवासीय आजपासून रमणार जुन्या पारंपरिक खेळांमध्ये…

3
2
Google search engine
Google search engine

“खेळ आठवणीतले” ; माझा वेंगुर्लेचे आयोजन…

वेंगुर्ले,ता.२४: चला खेळूया जुन्या-नव्या पारंपारीक खेळांचा आनंद लुटूया…याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी कोरोना महामारी व लाॅकडाऊन नंतर पुन्हा एकदा वेंगुर्ले येथे “माझा वेंगुर्ला”ने आणली आहे. माझा वेंगुर्ला आयोजित ‘खेळ आठवणीतले’ कार्यक्रम २४, २५, २६ डिसेंबरला रोज सायं. ३ ते ६ वाजेपर्यंत या वेळेत रा. कृ. पाटकर हायस्कुल मैदान वेंगुर्ला येथे होणार आहे.
हुतूतू, लंगडी, साखळी, लगोरी, आट्यापाट्या, अची-पची, रिंग-रुमाल, विटी-दांडू, काजुंचे खेळ (गल-मांड), ताईचा रुमाल, साईकल टायर, रिंग-रनिंग, स्लो सायकलिंग, गजरे (गुट्टे), आपरी-खापरी, डबा – एक्स्प्रेस, भोवरे, धनगर- शेळी-वाघ, डोंगर की? पाणी?, खांब-खांब, रस्सी-खेच, दोरी उडी, ऊठबस, पास रनिंग असे निखळ आनंद देणारे बालपणीतले खेळ खेळले जाणार आहेत.तरी नागरिकांनी या खेळात सहभागी व्हावे असे आवाहन माझा वेंगुर्ले तर्फे करण्यात आले आहे.