अडीज कोटी भरण्याची पात्रता नसलेले चाळीस कोटींची कर्जे मागतात हे दुर्दैव…

1
2
Google search engine
Google search engine

दिपक केसरकरांचा टोला; कोट्यावधीच्या ठेवींवर डोळा ठेवून विरोधकांचा जिल्हा बँकेत घुसण्याचा प्रयत्न…

सिंधुदुर्गनगरी ता.२६: जिल्हा बँकेत असलेल्या कोट्यावधीच्या ठेवींवर डोळा ठेवून विरोधक सहकारात घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्यांची अडीज कोटी भरण्याची पात्रता नाही, ते चाळीस कोटीची कर्जे मागतात,हे दुर्दैव आहे. त्यामुळे ते या ठीकाणी बसल्यावर काय करतील ? हे आधीच लक्षात घ्या, आणि अशा प्रवृत्तींना सहकारापासून दूर ठेवा, असे आवाहन आमदार दिपक केसरकर यांनी आज येथे केेले. दरम्यान यापुर्वी घेतलेली स्वतःची कर्जे माफ करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे असे झाल्यास गरीबांच्या बँकेला फटका बसणार आहे. त्यामुळे उमेदवारांशी जरी आपले नातेसंंबंध असले, तरी ते दूर ठेवून बँकेच्या हीताचा विचार करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्री.केसरकर आज येथे आयोजित जिल्हा बँकेच्या मेळाव्यात बोलत होते.

 

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, बंटी पाटील, खासदार विनायक राऊत, आमदार दिपक केसरकर, वैभव नाईक, सतिश सावंत, सुरेश दळवी, अनिल सावंत, प्रविण भोसले, संजय पडते, संदेश पारकर, निता राणे, सुशांत नाईक, प्रफुल्ल सुद्रीक, विकास सावंत, विलास गावडे आदी उपस्थित होते.