कणकवली उपतालुकाप्रमुखपदी महेश उर्फ गोट्या कोळूसलकर यांची निवड…

3
2
Google search engine
Google search engine

शरद वायंगणकरांची शिवसेनेतून हकालपट्टी ; जिल्हा बँक निवडणुकीत गद्दारी केल्याचा ठपका…

कणकवली ता. ०५ : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कणकवली उपतालुकाप्रमुख शरद वायंगणकर यांनी गद्दारी केल्याबद्दल त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. उपतालुकाप्रमुखपदी महेश उर्फ गोट्या कोळूसलकर यांची निवड जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी करून त्यांना सतीश सावंत यांच्या हस्ते नियुक्तपत्रही देण्यात आले.
पक्षाशी गद्दरी करणार्‍यांना पक्षात थारा देणार नसल्याचाही इशारा श्री. पडते यांनी दिला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शरद वायंगणकर यांचे बंधू व जिल्हा बँकेचे मतदार प्रमोद वायंगणकर हे बेपत्ता झाले होते. त्यानंतर ३ जानेवारीला प्रमोद वायंगणकर हे पोलीस स्थानकात हजर झाले होते. त्यामुळे शरद वायंगणकरवर पक्षाशी गद्दारी केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
यावेळी महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, डॉ. प्रथमेश सावंत, युवा सेना जिल्हाधिकारी तथा नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, संदेश सावंत पटेल, जिल्हा समन्वयक गीतेश कडू, शेखर राणे, मंगेश सावंत, राजू राठोड, अँड.हर्षद गावडे, प्रतीक्षा साटम, अमित मयेकर, तेजस राणे, दया कुडतरकर, रुपेश आमडोस्कर, विलास गुडेकर, ललित घाडीगांवकर, किरण वर्दम, रिमेश चव्हाण आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.