भालचंद्र महाराज यांचा २० पासून जन्मोत्‍सव

3
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.१५ : असंख्य भाविक भक्‍तांचे श्रद्धास्थान असलेल्‍या कणकवली शहरातील भालचंद्र महाराज यांचा ११८ वा जन्मोत्सव सोहळा २० त २४ जानेवारी या कालावधीत भालचंद्र आश्रम संस्‍थान येथे होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर केवळ धार्मिक विधी होणार आहेत. शासनाने घालून दिलेले नियम आणि अटींचे पालन करून अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा होणार असल्‍याची माहिती संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी दिली.
२० ते २४ जानेवारी या दरम्‍यान पहाटे समाधी पूजन, सकाळी ‘परमहंस भालचंद्र दत्‍तयाग’, दुपारी १ वाजल्‍यानंतर भजने आणि रात्री दैनंदिन आरती असे कार्यक्रम होणार आहेत. गुरूवारी २० रोजी श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. सोमवार २४ जानेवारी हा परमहंस भालचंद्र महाराज यांचा ११८ वा जन्मदिन असून त्यानिमित्‍त सकाळी समाधी पूजन, लघुरूद्र, दुपारी मर्यादीत भाविकांच्या उपस्थितीत बाबांचा जन्मोत्सव आणि नंतर भजने होणार आहेत. तर सायंकाळी सहा वाजता मंदिर परिसरात भक्‍तगणांच्या मोजक्याच उपस्थितीत बाबांची पालखी मिरवणुक होणार आहे. तर रात्रौ दैनंदिन आरती होणार आहे. जन्मोत्सवात होणारे विविध धार्मिक विधी भाविकांना युट्यूब व फेसबुकच्या माध्यमातून पाहता येणार आहेत. परमहंस भालचंद्र महाराज यांचा पाच दिवस साजरा होणारा जन्मोत्सव सोहळा शासनाचे नियम आणि अटींचे पालन करून साधेपणाने साजरा होणार आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी टाळावी आणि या जन्मोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.
————–