तुळस व होडावडे येथे सुरू असलेले रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम ग्रामस्थांनी रोखले…

4
2
Google search engine
Google search engine

निकृष्ट दर्जा असल्याचा आरोप; लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय…

वेंगुर्ले,ता.२४: तुळस व होडावडे येथील रस्त्याचे सुरू असलेले खड्डे भरायचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत तेथील ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले. दरम्यान यासंदर्भात संबंधित गावातील सरपंच, लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि आमदार दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

तुळस ते मळगाव राज्य मार्ग क्रमांक १८४ ची तुळस व होडावडा गावात अक्षरशः चाळण झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्याच्या दूरूस्तीसाठी अनेकवेळा अर्ज विनंत्या करुनही उपअभियंता सार्व. बांध.उपविभाग वेंगुर्ले यांनी आजपर्यंत बेजबाबदारपणे कानाडोळा केला.ग्रामस्थांनी आंदोलनाचे निवेदन देताच हे काम मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली.

तुळस,होडावडा,मातोंड,पेंडुर,वजराट,तळवडे,निरवडे व मळगाव इत्यादी गावातील वाहनचालकांच्या जिवीतेला धोका निर्माण झाला होता.अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत.भविष्यातील सुरक्षिततेच्यादृष्टीने संबंधीत अधिका-यांना झोपेतून जागे करण्यासाठी तातडीची बैठक घेण्यात आली होती.यावेळी रस्त्याच्या दर्जासंदर्भात सखोल चर्चा झाली.मात्र सदरचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी काम रोखले.उद्या पूनश्च आमदार दिपक केसरकर,कार्यकारी अभियंता सार्व.बांध.विभाग,सावंतवाडी,सगळ्या गावचे सरपंच व लोकप्रतिनीधी यांची बैठक बोलाविण्यात आली आहे.

यावेळी तुळस सरपंच शंकर घारे, पं.स.सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख यशवंत ऊर्फ बाळू परब, उपसरपंच सुशिल परब, होडावडा, मातोंड, पेंडुर गावचे सरपंच,तुळस ग्रा.पं.सदस्य जयवंत तुळसकर, सोनू आरमारकर, सौ.संजना परब,सौ.सुश्मिता बेहेरे, सौ.श्रद्धा गोरे, चंद्रे परब, सौ.नाईक, आधार फाऊंडेशन सिंधुदुर्गचे सचीव नंदन वेंगुर्लेकर, मातोंडचे प्रफुल्ल उर्फ बाळू परब, पत्रकार आप्पा परब, दिपेश परब, सार्व.बांध.विभाग सावंतवाडीचे उपविभागीय अभियंता शशांक भगत व ग्रामस्थ सहभागी झाले होते.