विविध कलाक्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलेल्या कलाकारांचा सन्मान…

2
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.२८: विविध कलाक्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलेल्या कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत, पोट्रेट कलाकार भूषण म्हापणकर व दशावतारातील पहिली स्त्री पखवाज वादक भाविका खानोलकर यांचा राधारंग फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने वेतोरे येथे अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.

राधारंग फाऊंडेशनचे संस्थापक रघुनाथ सरनाईक यांचे अमेरिका येथे वास्तव असून आपल्या कोकणातील कलावंत विद्यार्थी यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते नेहमीच राधारंग फाऊंडेशनच्या माध्यमातून येथील पदाधिकारी यांच्या सहकार्याने कार्यरत असतात. राधारंग फाऊंडेशन ही संस्था शालेय शैक्षणिक क्रीडा सर्वच क्षेत्रात गरजूंना मदतीसाठी कार्यरत आहे. याच अनुषंगाने विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विविध क्षेत्रातील कलावंतांचा अभिनंदनपर सत्कार कार्यक्रम श्री देवी सातेरी हायस्कूल कै सौ गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरेच्या प्रांगणात संस्थेचे कार्यवाह व राधारंगचे येथील अध्यक्ष प्रभाकर नाईक, मुख्याध्यापिका स्वाती वालावलकर शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी शिक्षक संजय परब ,ओवी पवार, सुजाता नाईक, पांडुरंग वगरे , प्रविणा पालव, प्रशांत सावंत, रविकांत कदम ,निलेश पेडणेकर, भावना मांजगावकर पालक आदी उपस्थित होते.

नृत्यांगना मृणाल सावंत ही गेली १४ वर्षे नृत्य क्षेत्रात कार्यरत असून तिने जिल्ह्यासह राज्य राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले. अलीकडेच कथक विशारद ही पदवी प्राप्त केली आहे. भूषण म्हापणकर हा पोर्टेट पेंटींगचे कोल्हापूर येथे दळवी आर्टस् कोल्हापूर येथे शिक्षण घेत आहे. पाट विद्यालय येथे त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन पुढे आर्ट जॉईन केले आहे. तर गौतमेश्वर दशावतार नाट्यमंडळ खानोली मध्ये प्रथमच खानोली येथील सुकन्या भाविका खानोलकर हिने दशावतार नाटकामध्ये पखवाज कला सादर करून रसिकांची वाहवा मिळविली होती. ती वेतोरे हायस्कूल येथे बारावीमध्ये शिकत असून तिला पखवाजचे मार्गदर्शन शिक्षक निलेश पेडणेकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे. या तिन्ही गुणी कलावंतांना राधारंगच्या वतीने रोख रकमेचे धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.