सांगेली नवोदय विद्यालयातील भांडार प्रमुख सतीश चव्हाण यांचे आकस्मिक निधन…

2
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२८:सांगेली नवोदय विद्यालयातील भांडार प्रमुख सतीश यादव चव्हाण (३७) मूळ रा.नाशिक यांचे आकस्मिक निधन झाले आहे. ही घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने स्थानिकांनी कलंबिस्त येथील एका खासगी दवाखान्यात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यांचा मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात छवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. तर घटनेची माहिती पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती, मयत चव्हाण यांना आज सकाळी अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांनी याबाबतची माहिती परिसरातील स्थानिकांनी दिली. त्यानंतर त्यांना कलंबिस्त येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान त्यांचा मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून पोलिसही त्या ठिकाणी दाखल झाले आहेत.

तर घटनेची माहिती मिळताच माजी सभापती तथा जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर यांनी रुग्णालयात धाव घेतली.