आडाळी एमआयडीसी मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करूया, दिशाभूल नको…

3
2
Google search engine
Google search engine

विकास कृती समितीची खंत; फक्त सातशे वीस एकर जमीन अधिसूचित करणार…

दोडामार्ग,ता.२८: आडाळी येथील एमआयडीसी प्रकल्प मार्गी लागण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. परंतु काही लोक चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. अशी खंत आडाळी औद्योगिक विकास समितीच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे. एमआयडीसी लवकरात लवकर व्हावी, या ठिकाणच्या युवकांना रोजगार मिळावा, यासाठी ग्रामस्थांनी नेहमी प्रयत्न केलेला आहे. परंतु काही मुद्दे पुढे करून अतिरंजितता आणण्याचा प्रकार केला जात असल्याचा आरोप संबंधित समितीच्या पदाधिका-यांनी केला आहे. याबाबत समितीच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देण्यात आली.
यात पराग गावकर, प्रवीण गावकर, शंकर गावकर, सुनील गावकर, संदिप गावकर, शैलेश गावकर, राजन गावकर यांनी आपले म्हणणे मांडले आहे.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, दिशाभूल करणारी माहिती मुळात आडाळी एमआयडीसीसाठी २८८ हेक्टर म्हणजेच ७२० एकर जमीन महामंडळाने अधिसूचित केली आहे. त्यापैकी काही भागात लोकवस्ती असल्याने तो वगळण्यात येणार आहे. तसेच साडे बारा किमीचे सरासरी २५ मीटर रुंदीचे रस्ते व अन्य सुविधा, तीव्र उताराचे डोंगर व पाणथळ क्षेत्र आदी भाग वगळता साधारण साडे चारशे एकर क्षेत्र उद्योगासाठी राखीव आहे. त्यामध्ये साडे पाच गुंठे पासून ते ९० एकर पर्यत सुमारे २६६ भूखंड उद्योगसाठी, ५ एमिनीटीज व ४ ओपन स्पेस, असे भूखंड आखण्यात आले आहेत. ही वस्तुस्थिती असताना बंधाऱ्याला विरोध करणाऱ्यांकडून सातशे कारखाने आडाळीत येणार अशी चुकीची माहिती दिली जात आहे.

आपल्या मुद्याला अतिरंजित करून दिशाभूल करून प्रश्नांची तीव्रता वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न खेडजनक आहे. नदीची वस्तुस्थिती

ज्या नदीवर कोल्हापूर टाईप झडपांचा बंधारा बांधला जात आहे, त्या नदीचा उगम पडवे – माजगाव येथे आहे. तिथून नदीच्या काठावर अनेक कृषी पंप गेली अनेक वर्षे पाणी उपसा करत आहेत. आडाळी, पडवे माजगाव व मोरगाव या तीनही गावांची नळपाणी योजना याच नदीवर माजगाव मध्ये आहे. या नदी व उपशाखावर मोरगावात दोन मोठे व दोन लहान कोल्हापूर टाईप बंधारे आहेत. आडाळीत मात्र एकही बंधारा नाही. तरीही येथील नदिकाठावर बागायतीचे अस्तित्व आहे.

एमआयडीसी क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रातील पाणीही बांधकाम सुरु असलेल्या बांधऱ्याच्या खालच्या बाजूने नदीला मिळते. तसेच अन्य उपशाखाही आहेत. शिवाय बांधाऱ्यातून पाणी पाटद्वारे वळविले जाणार नाही. येथील क्षेत्र हे ग्रीन कॅटेगरितील उद्योगासाठी आहे. त्यामुळे अन्य उद्योगाच्या तुलनेत पाणी कमी लागणार आहे. दिवसात केवळ पाच ते दहा लाख लिटर पाणी उचलले जाईल. उर्वरित पाणी वाहतेच राहणार आहे.