सावरवाड परिसरात भरवस्तीत बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये भीती…

3
2
Google search engine
Google search engine

 

तात्काळ बंदोबस्त करा; रवींद्र मडगावकर यांची वनविभागाकडे मागणी…

सावंतवाडी ता.३०: सावरवाड परिसरात गेले काही दिवस भर वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर त्याच्यासोबत एक पिल्लू असल्यामुळे ती मादी असल्याचा अंदाज, स्थानिकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान “त्या” बिबट्याचा बंदोबस्त करा, अशी मागणी जिल्हा बँक संचालक तथा पंचायत समिती माजी सभापती रवींद्र मडगावकर यांनी वनविभागाकडे केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, सावरवाड परिसरात मोठ्या प्रमाणात वायंगणी शेती केली जाते. तर येथील जंगलमय परिसरात स्थानिक महिला लाकूडफाटा गोळा करण्यासाठी जात असतात. यावेळी अनेकांना या बिबट्याने दर्शन दिले आहे. त्यामुळे परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण पसरले असून त्या ठिकाणी बिबट्या कडून हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान याची गांभीर्याने दखल घेऊन त्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा, अशी मागणी श्री. मडगावकर यांनी वनविभागाकडे केली आहे.