शिरोडा-शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दिपीका खोबरेकरचा सत्कार…

0
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.०२: शिरोडा येथील श्री देवी माऊली सभागृह येथे शिवसेना महिला आघाडी शिरोडा यांच्या वतीने कै.सौ.सुविधा शंकर भाई कांबळी यांच्या स्मरणार्थ हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधून निबंध स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर पहिला क्रमांक पटकावणारी शिरोडा, केरवाडी गावची सुकन्या कु. दिपीका राकेश खोबरेकर हीचा सत्कार माजी आमदार शंकर कांबळी व शिवसेना महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले यांच्या हस्ते शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी आम.कांबळी यांनी तालुक्यातील विकासासाठी कोणाच्या पैशाच्या आमिषाला बळी न पडता शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असे आवाहन करत शिवसेनेच्या कार्याला उजाळा दिला. तर महिला आघाडीच्या सौ. नरसुले यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या योजनांचा लाभ घेऊन महिलांनी सक्षम व्हायला हवे तसेच बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारचे छोटे छोटे व्यवसाय सुरू करून रोजगार निर्मिती करून प्रगती केली पाहिजे व स्वतः च्या पायावर खंबीरपणे उभे राहून सामाजिक कार्य करत समाजासमोर आदर्श ठेवला पाहिजे असे आवाहन केले. यावेळी शिरोडा माजी सरपंच व शिरोडा विकास सोसायटी अध्यक्ष श्री राजन गावडे, शिवसेना उपतालुका संघटिका सौ शितल साळगावकर, विभाग प्रमुख काशिनाथ नार्वेकर, ग्रामपंचायत सदस्य कौशिक परब, सौ.रोहिणी खोबरेकर, सौ.मयुरी राऊळ, कु. स्वरुपा गावडे, सामाजिक कार्यकर्ते श्री.अमित गावडे, रेडी ग्रामपंचायत सदस्या सौ.वंदना कांबळी, सौ.सायली पोखरणकर, उपविभाग रेडी सौ.शिल्पा वस्त, शाखा संघतिका सौ.स्नेहा साळगावकर, कु. वर्षा वडर शिवसेना महिला आघाडी, शिरोडा च्या विभाग संघटिका सौ.रश्मी डिचोलकर, उपविभाग शिरोडा सौ. हर्षा परब, युवासेना विभागप्रमुख कु.नंदिनी धानजी, शाखा संघटीका सौ.उमा मठकर, सौ.लतिका रेडकर, सौ. संध्या धानजी, सौ.अनिता पडवळ, सौ. सिमा शिंदे, सौ.प्रिया हाड्ये, सौ. संजना नार्वेकर आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन सौ शितल साळगावकर यांनी तर सूत्रसंचालन सौ.हर्षा परब यांनी केले.