फडणवीसांच्या “त्या” वक्तव्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे…

2
2
Google search engine
Google search engine

ओरोस,ता.०२: टिपू सुलतान यांच्या संदर्भात अवमानकारक विधान करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्थ आज बहुजन मुक्ती पार्टी, छत्रपती क्रांती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन छेडले. यावेळी अवमानकारक विधान करणाऱ्या फडणवीस यांच्यावर कठोर व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. तसेच याबाबत तात्काळ योग्य तो निर्णय न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.