सिंधुदुर्गात पुन्हा दुर्मिळ बॉम्बे ब्लड ग्रुपचे रक्तदान…

2
2
Google search engine
Google search engine

सुधीर कांबळी दुर्मिळ रक्तदाता; गावडे कुटुंबीयांनी मानले आभार…

बांदा,ता.१०: सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे सदस्य आणि बॉम्बे ब्लड ग्रुपचे रक्तदाते सुधीर कांबळी यांनी नुकतेच ओरोस येथे रक्तदान केले. मालवण तालुक्यातील नांदोस येथील राजाराम गोविंद गावडे यांना हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे रक्तगटाची आवश्यकता होती.यावेळी श्री कांबळी आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानांचे गावडे कुटुंबियांनी आभार मानले.

बाँबे ब्लड ग्रुप हा जगाच्या लोकसंख्येत १० लाख लोकांत फक्त ४ जणांचाच असतो, त्यामुळे तो अत्यंत दुर्मिळ असाच आहे, तरिही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पर्यंत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून व रक्तपेढींच्या सहकार्याने तब्बल ४ रक्तदाते या गटाचे मालवण तालुक्यात सापडले आहेत, तसेच मालवणात या चारांसह एकूण ७ लोक या रक्तगटाचे सापडले आहेत. आणि जिल्ह्यात एकूण १४ ची नोंद झाली आहे. म्हणजेच आपल्या जिल्ह्यात या गटाची संख्या वाढत आहे, त्यातही मालवण तालुका या गटाने सधन असल्याचे समजतेय.यासाठी पूर्ततेसाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रकाश तेंडोलकर, सचिव किशोर नाचणोलकर यांनी प्रयत्न केले.