मेडिकल काॅलेजच्या मंजुरीसाठी संसदेची ताकद उपयुक्त ठरली…

5
2
Google search engine
Google search engine

विनायक राऊत; मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द सत्यात याचा आनंद….

सावंतवाडी,ता.१०: संसदेची ताकद महाविद्यालय मंजुरीसाठी उपयुक्त ठरली. त्यामुळे आता सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश प्रकिया सुरू होईल अशी प्रतिक्रीया खासदार विनायक राऊत यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यवासीयांची इच्छाशक्ती महाविद्यालयासाठी महत्त्वाची आहे. जिल्हावासीयांची मागणी होती. तसेच सावंतवाडी येथील वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा सुरू होता. याचे फलित झाले, असेही राऊत म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडीने आर्थिक तरतूद करण्यासाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना वैद्यकीय महाविद्यालयाचा शब्द दिला होता तो सत्यात येत आहे, असे खासदार राऊत यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी देखील वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यासाठी खंबीरपणे भुमिका घेतली आहे, असे ते म्हणाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीसाठी अडथळे निर्माण झाले होते. ते निर्माण करण्यात येत होते. लोकसभा अधिवेशनात संसदेत अडथळे निर्माण करण्यात आले. त्यावर संसदेत बोलताना सिंधुदुर्गवासीयांचे स्वप्न असलेले वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधले होते. संसदेची ताकद महाविद्यालय मंजुरीसाठी उपयुक्त ठरली आहे, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.