भाजप सरकारच्या विरोधात १५ फेब्रुवारीला कणकवलीत आंदोलन…

2
2
Google search engine
Google search engine

बाळा गावडेंची माहिती; जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन…

सावंतवाडी,ता.१३: केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी १५ फेब्रुवारीला कणकवली येथे आंदोलन करण्यात येणार आहे,अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी दिली.दरम्यान कणकवली काँग्रेस कार्यालयात जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे,असे आवाहनही श्री गावडे यांनी यावेळी केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

यात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महाराष्ट्राने देशात कोरोना आणला’ असे महाराष्ट्राबाबत चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांचा व केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी १५ फेब्रुवारीला सकाळी १०:३० वाजता कणकवली येथे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे,असे त्यांनी म्हटले आहे.