संजय राऊतांची आजची पत्रकार परिषद म्हणजे “फुसका ट्रेलर”..

2
2
Google search engine
Google search engine

प्रविण दरेकर; तपास यंत्रणेच्या विरोधात काही म्हणणे असेल तर न्यायालयात दाद मागावी…

मुंबई,ता.१५: शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आज एकटे पडले. आजच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या नेत्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे आजची त्यांची पत्रकार परिषद म्हणजे “फुसका ट्रेलर” होता, अशी खिल्ली भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे उडवली. दरम्यान श्री. राऊत हे सैरभैर झाले आहेत. त्यामुळे ते काही बोलत आहेत. तपास यंत्रणेच्या विरोधात शिवसेनेचे काय म्हणणे असेल, तर त्यांनी न्यायालयात दाद मागावी, असेही श्री. दरेकर यांनी यावेळी सांगितले. श्री.राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

श्री.दरेकर पुढे म्हणाले, श्री.राऊत यांनी आज मोठमोठ्या घोषणा करून पत्रकार परिषद घेतली. मात्र त्याकडे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे त्यांची पत्रकार परिषद फुसका ट्रेलर होता, असा टोला त्यांनी लगावला. तर इडीच्या तपास यंत्रणेबाबत त्यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांना काहीच संशय असेल तर त्यांनी याबाबत न्यायालयात दाद मागावी, उगाच कोणतेही आरोप करू नयेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.