आमदार दीपक केसरकर यांचा उद्या सिंधुदुर्ग दौरा…

1
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१८: माजी राज्यमंत्री तथा विधानसभेचे विशेष समिती हक्क प्रमुख तथा आमदार दीपक केसरकर हे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे.

यात सकाळी ९:०० वा. सावंतवाडीतील गांधी चौकात शिवजयंती उत्सवात उपस्थिती, १०:०० वा. बांदा येथे शिवजयंती उत्सवास उपस्थिती, ११ वा. झोळंबे, भिडेवाडी, दापटेवाडी रास्ता खडीकरण-डांबरीकरण कामाचे भूमिपूजन, ११:३० वा. फुकेरी येथे प्रस्तावित धरणाची पाहणी, ग्रामस्थांसोबत चर्चा व वैजामाऊली मंदिरात भेट, १:१५ वा. ओटवणे मुख्य रस्ता ते ओटवणे घाटी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन, २:३० वा. बावळाट येथे पुलाचे बांधकाम, खालची वाडी व वरची वाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचा शुभारंभ, सायंकाळी ४:०० वा. आंबोली फणसवाडी येथे पूल बांधणी कामाचा शुभारंभ, ४:३० वा. आंबोली येथे शिवजयंती उत्सवास उपस्थिती, ५:३० चौकुळ शिवजयंती उत्सवास उपस्थिती तसेच खासकिल वाडा ते पाटील वाडीला जोडणाऱ्या साकवाचे भूमिपूजन, आंबोली चौकुळ तेरवण मध्ये लहान पुलाचे भूमिपूजन, ७:००वा प्रकाश परब यांच्या स्मरणार्थ तळवडे येथे रस्सीखेच स्पर्धेला उपस्थिती, ८ :०० वा. देवगड येथे विठ्ठलादेवी नूतन ग्रामसचिवालय उद्घाटन सोहळ्यास भेट, ९:०० वा. वैभववाडी येथे नापणे महोत्सवास भेट, असा असणार आहे.