वैभववाडीच्या स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेचे मनोज सावंत यांची निवड…

2
2
Google search engine
Google search engine

वैभववाडी,ता.१८: वाभवे-वैभववाडी नगरपंचायच्या स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेकडून मनोज उर्फ बंड्या सावंत यांची निवड जाहीर झाली आहे. येथील नगरपंचायत सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली राजमाने, मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्या उपस्थितीत निवडणूक कार्यक्रम पार पडला. निवडीनंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला. या नगरपंचायतमध्ये भाजपाचे १० नगरसेवक, शिवसेना ५ व अपक्ष २ असे पक्षीय बलाबल आहे. एकूण दोन पदे स्वीकृत नगरसेवकसाठी मंजूर होती. त्यापैकी एक स्वीकृत नगरसेवक भाजपाच्या वाट्याला आले. तर दुसरे शिवसेनेच्या कोट्यातून आहे. शिवसेना स्वीकृत नगरसेवकपदी मनोज सावंत यांची निवड झाली आहे.