सिंधुदुर्गात कोरोना निर्बंधांमध्ये अधिक शिथिलता द्या…

2
2
Google search engine
Google search engine

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; जिल्ह्याचा “अ” यादीत समावेश असल्याने निर्णय….

सिंधुदुर्गनगरी,ता.०९: जिल्ह्यातील कोरोना निर्बंधांत अधिक शिथिलता देण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत. ७० टक्के लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. तसेच जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर ऑक्सिजन सपोर्टेड किंवा आयसीयू बेड ४० टक्के पेक्षा कमी रुग्णानी भरलेले असल्याने जिल्ह्याचा समावेश “अ” यादीमध्ये केलेला आहे. त्यामुळे कोरोना निर्बंधांत अधिक शिथिलता देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

या आदेशात म्हटले आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाकडील दि. 13 मार्च 2020 रोजीच्या अधिसूचनेद्वारे साथरोग अधिनियम, 1897 मधील खंड 2,3 व 4 ची अंमल बजावणी राज्यात सदर अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून सुरु करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र शासनाकडील महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील दि. 1 मार्च 2022 रोजीच्या आदेशानुसार  वेगवेगळ्या भागातील कोव्हीड -19 ची सद्यस्थिती, त्या भागात असलेली जोखीम, त्याठिकाणची लसीकरणाची स्थिती, पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी व्यापलेली बेडची संख्या या आधारावर कोव्हीड – 19 च्या अनुषंगाने नियमांमध्ये शिथिलता देणेबाबत नवीन आदेश जारी केलेले आहेत. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 18 वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या 90% लोकांनी लसीचा पहिला डोस, त्याचप्रमाणे 70% लोकांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असल्याने, व ऑक्सिजन सपोर्टेड किंवा ICU बेड 40% पेक्षा कमी रुग्णांनी भरलेले असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश अ यादीमध्ये केलेला आहे. उपरोक्त प्रमाणे वस्तुस्थिती लक्षात घेता राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडील दि. 1 मार्च 2022 रोजीच्या आदेशान्वये पारित केलेल्या आदेशाप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कार्यालयाकडून दि. 10 जानेवारी 2022 रोजी पारित केलेल्या आदेशामध्ये अधिक शिथिलता देणे आवश्यक आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांना  साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 चे कलम 2 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन मदत व पुनर्वसन विभागाकडील दि. 1 मार्च 2022 रोजीच्या आदेशान्वये ‘अ’ यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सामावेश केलेला असल्याने कोविड-19 विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता दि. 10 जानेवारी 2022 रोजीच्या आदेशान्वये लागू करण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिलता देवून खालीलप्रमाणे सूचना व निर्देश पुढील आदेश पावेतोपर्यंत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लागू करीत आहे.