मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे होळी पूर्वी भरा…

1
2
Google search engine
Google search engine

अशोक चव्हाण; अपघात होणार नाही, यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन…

मुंबई,ता.०९: मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे होळी पूर्वी भरा, होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अपघात होणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे आयोजित बैठकीत दिल्या.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची सद्यस्थिती तसेच होळीनिमित्त वाढणारी रहदारी व त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांच्या संदर्भात विधान भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब, रायगडच्या पालकमंत्री कु. अदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव नवघरे, मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग श्री.शेलार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोकण विभागाचे मुख्य अभियंता राजभोज आदी उपस्थित होते. महामार्ग सुरक्षा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, कोकणचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे, तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.